Gold Rate: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढत्या दरामुळे सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ दिसून आली आहे. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर ६-७ मे च्या रात्री हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात नऊ दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने १८०० रुपयांनी वाढले होते. त्यानंतर मंगळवारी १४०० रुपयांनी तर बुधवारी ५०० रुपयांनी वाढले. यामुळे गेल्या तीन दिवसात जळगावात सोने दरात ३७०० रुपयांनी वाढले आहे. सलग तीन झालेल्या या तर जीएसटीसह १००६३१ रुपयावर पोहोचला आहे . तसेच चांदीचा दर ९८००० रुपयावर आहे.
सोन्याच्या किमती का वाढत आहे ?
सोन्याच्या किमती वाढण्यामागे अनेक मोठी कारणे आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी औषधे आणि चित्रपटांवर भारी कर लादण्याबद्दल बोलले आहे, ज्यामुळे जगभरातील व्यापाराबद्दल चिंता वाढली आहे. याशिवाय रशिया-युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष आणि भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव यामुळे, गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. यासह डॉलरची कमकुवतता हे देखील एक मोठे कारण आहे, त्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे.