---Advertisement---

खुशखबर! आता गायरान जमिनीवर आदिवासींना मिळणार घरकुल

---Advertisement---

गायरान जमिनीवर राहणाऱ्या गरजू लाभार्थ्यांना घरकुल आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या व माजी आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नातून अखेर प्रश्न मिटला असून, आता आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळणार आहे.

चोपडा मतदारसंघातील यावल तालुक्यातील चुंचाळे या ठिकाणी असलेल्या गायरान आदिवासी वस्तीतील घरकुलाचा लाभमिळणार आहे. सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड गावातील आदिवासी घरकुल लाभार्थी यांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांना घरकुल बांधकाम लवकर करावे याबाबत सांगितले.

तालुक्यातील चुंचाळे या गाव परिसरातील आदिवासी बांधव राहात असलेल्या गायरान वस्तीमध्ये घरकुल योजनेसाठी स्वतःची जागा असणे आवश्यक असते, परंतु गायरान आदिवासी बांधवांकडे स्वतःची जागा उपलब्ध नसल्यामुळे घरकुल बांधकाम होत नव्हते.



आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नाने जिल्हाधिकारी जळगाव चुंचाळे गायरान येथील जागा घरकुलासाठी मंजूर करून घेतली. जागा मंजूर झाल्यामुळे आदिवासी गायरान वस्तीतील ७३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले. सन२०१६/१७ चुंचाळे गायरानमध्ये १३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊन ३० हजार रुपये पहिला हप्ता देण्यात आला. २०१९/२० मध्ये १७ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊन १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला. हे सर्व मंजूर लाभार्थी ब यादीतील आहेत.

शासनाच्या नियमानुसार प्रत्येक लाभार्थ्यांना ३०० चौरस फूट जागा देऊन त्या लाभार्थ्याने त्या जागेवर घरकुल बांधकाम करणे आवश्यक आहे. या चर्चेप्रसंगी बैठकीत गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, ग्रामसेवक भूषण बिऱ्हाडे यांच्यासह शिवसेनेचे भरत चौधरी, मुबारक तडवी, संजय पाटील, उपसरपंच आबा पाटील, हर्षल चौधरी, सुधाकर कोळी, तितऱ्या बारेला, कलिंदर तडवी, आदिवासी बांधव घरकुल लाभार्थी व ग्रामस्य याप्रसंगी उपस्थित होते

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment