जळगाव : सध्या नात्याला काळिमा फासेल अश्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहेत. अशात गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी सासरी आलेल्या एका जावयानेच अल्पवयीन मेहुणीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जावयाने केलेल्या या कृत्यामुळे सासुरवाडीतील मंडळी हैराण झाली असून, या प्रकारानंतर सासरच्या मंडळींनी थेट पोलीस ठाणे गाठून जावयाची तक्रार केली. याप्रकरणी जावयाविरुध्द फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. फिर्यादी सासूची मोठी
मुलगी गर्भवती असल्यामुळे तिला भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी जावयी सासरी आला होता. दरम्यान, जावयाने अल्पवयीन मेहुणीला तब्येतीची तक्रार असल्याचे सांगून दवाखान्यात नेले, मात्र जावयाने तिला दवाखान्यात न नेता थेट पळवून नेले.
या प्रकारानंतर सासुरवाडीतील मंडळी आसपासच्या गावांमध्ये शोध घेतला, मात्र त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर जावयाने केलेल्या या कृत्यामुळे सासुरवाडीतील मंडळी हैराण होऊन थेट पोलीस ठाणे गाठून जावयाची तक्रार केली. त्यानुसार याप्रकरणी जावयाविरुध्द फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर गावात चर्चेला उधाण आले असून पळून गेलेल्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा फत्तेपूर पोलीस ठाण्यातील अधिकारी तपास करत असून, जावयाच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.