---Advertisement---
India-Pakistan ceasefire: ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी यांच्याकडून कोणते वक्तव्य येणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अखेर पंतप्रधानांनी पाकला ठणकावत, गोळी चालवाल तर तोफगोळे चालवले जातील, अशा शब्दात सुनावले आहे.
एवढेच नाही तर कोणत्याही कारवाईसंदर्भात भारताला कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, असे म्हटले आहे. पाकिस्तानने जर पुन्हा गोळीबार केला तर आम्ही देखील गोळीबार करू आणि जर त्यांनी हल्ला केला तर आम्ही देखील त्यांला चोख प्रत्युत्तर देऊ, असे स्पष्टच सांगितले आहे.
रविवारी झालेल्या तिन्ही दलाच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला आहे. तिथून गोळ्या झाडल्यास, येथून तोफगोळे झाडले जातील, असा इशारा मोदींनी पाकिस्तानला दिला आहे की. तसेच ऑपरेशन सिंदूरमधील पाकिस्तानमधील हवाई तळांवरील हल्ले हा महत्त्वाचा टप्पा असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.