---Advertisement---
जळगाव : भारत-पाक युद्धबंदी करारानंतर सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एक तोळा सोने १८०० रूपयांनी स्वस्त झाले असून, खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारत-पाक तणावामुळे सोन्याच्या किमतींनी थेट विक्रमी पातळी ओलांडली होती. मात्र आता युद्धविराम झाल्यानंतर सोन्याचे दर गडगडले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी एक तोळा सोने १८०० रूपयांनी स्वस्त झाले असून, खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जळगावच्या सुवर्णपेठेत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २२ कॅरेट सोने १६५० रूपयांनी स्वस्त झाले आहे. प्रतितोळा सोन्याची किंमत ८८,९५० रूपये इतकी झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या किमतीतही घसरण झाली आहे. २४ कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत ९६,८८० रूपये इतकी झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीतही घसरण झाली असून, चांदीची किंमत ११० रूपयांनी घसरली आहे. यानंतर एक किलो चांदीची किंमत ९७९०० रूपये इतकी झाली आहे.
---Advertisement---
मुंबईत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९,८६७ रुपये तर २२ कॅरेट सोने ९,०४४ रुपयांवर आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर, येथे २४ कॅरेट सोने ९,८८२ रुपये आणि २२ कॅरेट सोने ९,०५९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोने ९,८६७ रुपयांवर आहे तर २२ कॅरेट सोने ९,०४४ रुपयांवर आहे. बंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोने ९,८६७ रुपयांवर आहे, तर २२ कॅरेट सोने ९,०४४ रुपये प्रति १० ग्रॅमला विकले जात आहे. कोलकातामध्ये २४ कॅरेट सोने ९,८६७ रुपयांवरआहे तर २२ कॅरेट सोने ९,०४४ रुपये प्रति १० ग्रॅमला विकले जात आहे. तर बेंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ९,८६७ रुपयांवर तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ९,०४४ रुपयांवर आहे.
अमेरिका-चीन व्यापार करारातून सकारात्मक कल
जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक कल आणि गुंतवणूकदारांकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या अपेक्षांमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत ही घसरण झाली आहे. आशियाई बाजारात सोन्याचे दर १.४ टक्क्यांनी घसरून ३,२७७.६८ डॉलर प्रति औंस झाले. तर, अमेरिकन सोन्याचा वायदा १.९ टक्क्यांनी घसरून $३,२८१.४० वर आला. अमेरिका आणि चीनमधील व्यापार करारानंतर पिवळ्या धातूच्या किमतीत ही घसरण झाली आहे. जगातील या दोन्ही आर्थिक महासत्तांकडून आज एक संयुक्त निवेदन जारी केले जाण्याची अपेक्षा आहे.