SSC Exam Result: काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. बारावीच्या निकालात राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागून आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
मंगळवारी म्हणजेच उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावीचा निकाल पाहता येईल. बोर्डाची पत्रकार परिषद मंगळवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. त्यानंतर ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर जारी होतील.
येथे पहा निकाल?
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.digilocker.gov.in