अमळनेर : प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला आज दि. 12 मे 2025 रोजी पालखी सोहळ्याने प्रारंभ झाला. अमळनेरातील बोरी नदीपात्रात हा यात्रोत्सव महिनाभर चालतो. या सात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘तरुण भारत’ने वाचकांसाठी ‘श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सव पुरवणी’ प्रसिद्ध केली. या विशेष पुरवणीचे प्रकाशन विद्यमान मठाधीपती प्रसाद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सव पुरवणी ही श्री सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी संस्थान, अमळनेर आणि येथील संत परंपरेचा गौरवशाली प्रवास दर्शविणारा आहे. एकंदरीत, श्री संत सखाराम महाराज यांच्यापासून सुरू झालेल्या गादी परंपरेचा उज्ज्वल वारसा मांडणारी ही विशेष पुरवणी आहे.
या संस्थानात आतापर्यंत 10 गादीपुरुष होऊन गेले असून, सध्या श्री प्रसादजी महाराज हे विद्यमान मठाधिपती म्हणून वारसा चालवत आहे. अशा या संत परंपरेचा उज्ज्वल वारसा सांगणाऱ्या या विशेष पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पुरवणी प्रकाशनप्रसंगी खासदार स्मिता वाघ, ‘तरुण भारत’चे संपादक चंद्रशेखर जोशी, शाखा व्यवस्थापक भावना शर्मा, विपणन व्यवस्थापक मनोज बोरसे, विपणन सहायक गायत्री कुलकण, आमदार अनिल भाईदास पाटील, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, भाजप युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्षा भैरवी पलांडे-वाघ, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर महाले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.