अमळनेर : येथील संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थानचा पालखी उत्सव सोहळा वैशाख शुद्ध पौर्णिमेला सोमवारी सकाळी सहा वाजता उत्साहात सुरू झाला. हा पालखी सोहळा प्रचंड जल्लोषात पार पडला.
पालखीची विधिवत पूजा केल्यानंतर वाडी संस्थानातून पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. त्यावेळी प्रसाद महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रांग लागली होती. पालखीमध्ये भरजरी पोशाखात अलंकारांनी नटलेली लालजींची मूत सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
वेद पाठशाळेचे विद्याथ ठरले आकर्षण
पालखीच्या सर्वात पुढे बेलापूर महाराज यांचे भजनी मंडळ भजन गात होते. त्यानंतर दिंडी, लेझीम पथक होते. वेद पाठशाळेचे विद्याथ मृदुंग टाळ वाजवून सर्वांचे लक्ष वेधत होते. ब्राह्मण संघ व शहरातील भक्तगण ‘सखाराम महाराज की जय’चा जयघोष करीत होते. पालखीच्या सर्वात मागे प्रसाद महाराज पायी चालत असल्याने भाविक दर्शन घेत होते. संस्थान चे विश्वस्त ऍड. रविंद्र देशमुख, श्री. बापू देशमुख, श्री भानगावकर, श्री. राजेंद्र भामरे (पुणे), श्री. राहुल देशमुख (मुंबई) तसेच संस्थांचे कर्मचारी आणि भक्त परिवार उपस्थित होता.
पालखी मार्गात भालदार -चोपदार
पालखी मार्गात प्रसाद महाराजांसोबत भालदार -चोपदार, अनिल भालेराव, नितीन कुलकण, विनोद पेंटर, मनोज भांडारकर, भटू सोनार, उदय देशपांडे, मनोज देवकर, सुरेश चौधरी, सारंगधर गुरुजी सेवेत होते.
भुसावळचा रेल्वे बँड मिरवणुकीचे आकर्षण
प्रसाद महाराज पालखी मार्गात पानसुपारीसाठी भक्तांच्या घरात पाच पाच मिनिटे वेळ देत होते. भुसावळचा रेल्वे बँड मिरवणुकीचे आकर्षण होता. भुसावळच्या रेल्वे बँडने वाडी संस्थान ते दगडी दरवाजापर्यंत वादन केले. दगडी दरवाजापासून पुढे पालखी सोहळा संपेपर्यंत चाळीसगावचा सदगुरू बँड सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनला होता.
पालखी मार्ग
बालाजी मंदिर, राजोळी चौक, पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी पुलावरून पैलाडमधून नवीन पुलावरून रात्री अकरापर्यंत समाधी स्थळापर्यंत पोहोचला. पालखी मार्गावर नागरिकांनी विविध ठिकाणी रांगोळी काढून व फुलांनी पालखीचे स्वागत केले.
मार्गात स्वागत फलक
विविध सामाजिक संस्था व भावी नगरसेवकांकडून स्वागत फलक लावण्यात आले होते. पालखी सोहळ्यानिमित्त पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालखी मार्गात विविध सामाजिक संस्थांकडून पाणी व फराळ वाटप करण्यात येत होते. तसेच अमळनेर नगर परिषदेकडूनही पालखी मार्गात विविध बॅनर लावलेले होते. त्यात यात्रोत्सव नकाशा व यात्रेची माहिती होती. पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी अमळनेरच्या सर्व भक्तांनी सहकार्य केले.