---Advertisement---
SSC Exam Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदाही दहावीमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. मुली या मुलांपेक्षा अव्वल ठरल्या आहेत. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये दहावीची परीक्षा झाली होती. विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ ने जास्त आहे. बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणाचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
---Advertisement---