Water Resources Department: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आसाम लोकसेवा आयोगाने (APSC) जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार apsc.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकतात. आ अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून आहे, उमेदवारांनी या तारखेपर्यंत अर्ज करावेत.
कोण अर्ज करू शकतो?
उमेदवार भारताचा नागरिक आणि आसामचा कायमचा रहिवासी असावा. अर्जासोबत रोजगार विनिमय प्रमाणपत्र किंवा कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. AICTE द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असावा.
वयोमर्यादा
या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.
पगार किती ?
या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना १४,००० ते ७०,००० रुपयांपर्यंत पगार मिळेल आणि ग्रेड पे ८,७०० रुपये असेल. याशिवाय, आसाम सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते देखील दिले जातील. हे पगार पे बँड-२ अंतर्गत दिले जाईल.
अर्ज फी
अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना २९७.२० रुपये, ओबीसी/एमओबीसी श्रेणीतील उमेदवारांना १९७.२० रुपये आणि एससी/एसटी/बीपीएल/पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांना ४७.२० रुपये भरावे लागतील.