Rohit Sharma: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्मा यांची मुंबईतील वर्षा येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अभिनंदन केले. फडणवीस यांनी रोहितच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीचे कौतुक केले. या भेटीत राज्य सरकारने रोहितच्या खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे आणि त्याच्या योगदानाचे कौतुक केले. फडणवीस यांनी रोहितसोबतच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित शर्मासोबतच्या भेटीचे फोटो एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट केले आहेत. “टीम इंडियाचा क्रिकेटर रोहित शर्मा याचं माझ्या शासकीय निवासस्थानी स्वागत. रोहितला भेटून आणि त्यासोबत बोलून मला आनंद झाला. मी रोहितचं कसोटी क्रिकेटमधील योगदानसाठी अभिनदंन केलं आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या”, असं फडणवीस यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय
मुख्यमंत्री फडणवीसंचय भेटीनंतर रोहित लवकरच राजकारणात उतरणार का? अशी चर्चा आता सोशल माीडियावर पाहायला मिळत आहे. त्याला कारणही तसेच आहे, यापूर्वी अनेक क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे रोहितही तसंच करणार का? असा प्रश्न निर्माण होणे काही वेगळं ठरणार नाही.
रोहितची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
रोहितने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात जेतेपद जिंकल्यानंतर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आणि आता तो फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळताना दिसेल. रोहितने ७ मे रोजी इंस्टाग्राम पोस्टद्वारे कसोटी क्रिकेटला निरोप देण्याची माहिती दिली होती. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहितने हा निर्णय घेतला.