---Advertisement---

घर भाड्याने न दिल्याचा राग, तरुणाला थेट कुटुंबासमोरच संपवलं; अखेर आरोपीला कठोर शिक्षा

---Advertisement---

धुळे : घर भाड्याने दिले नाही, या क्षुल्लक कारणावरून शहरातील राजीव गांधी नगरात राहणारा रवींद्र काशिनाथ पगारे (वय २८) याचा भरवस्तीत त्याची आई, मुलगा व पत्नी यांच्यासमक्ष चाकूने भोसकून निघृण खून केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपी जय ऊर्फ दादा वाल्मीक मोरे यास सत्र न्यायाधीश डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात खटल्याचा निकाल लागेपर्यंत आरोपीला जामीन देण्यात आला नव्हता व हा खटला अंडर ट्रायल चालविण्यात आला.

राजीव गांधी नगरातील रहिवासी सराईत गुन्हेगार जय मोरे यास राजीव गांधी नगरातील भटू पगारे याचे घर भाडे तत्त्वावर पाहिजे होते, परंतु त्यास ते घर न देता दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आले. जय मोरे यास कंटाळून भटू पगारे हा मोराणे येथे राहण्यास निघून गेला होता. याचा राग येऊन दि. २० डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आरोपी जय मोरे हा भटू पगारे याचा भाऊ रवींद्र पगारे याच्याकडे गेला. त्यावेळी रवींद्र याची पत्नी, तिचे लहान बाळ सिद्धू यास दूध पाजत होती.

---Advertisement---

मोठा मुलगा प्रथमेश हा जवळच उभा होता. रवींद्रची आई निलाबाई अंगणातच बसलेली होती. त्यावेळी जय याने रवींद्र यास शिवीगाळ केली व विजारीतून चाकू बाहेर काढला व कोणाला काही समजण्याच्या आत रवींद्र याच्या छातीत खुपसला व तेथून तो पळून गेला. जखमी अवस्थेत रवींद्र यास औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

या प्रकरणी रवींद्रची पत्नी कविता स्वींद्र पगारे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जय मोरे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे यांच्याकडे सोपविण्यात आला. पो.नि. तिगोटे यांनी तपास करीत तत्काळ जय मोरे यास अटक केली. तसेच खुनासाठी वापरलेले हत्यार तसेच मयत, फिर्यादी, आरोपी यांच्या अंगावरील रक्ताने माखलेले कपडे ताब्यात घेऊन न्यायालयात सादर केले. साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून घटनेचा सखोल तपास करून आरोपी जय ऊर्फ दादा वाल्मीक मोरे यास सत्र न्यायाधीश डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---