---Advertisement---

Jalgaon Crime News : गोळी सुटली अन् थेट नाजीमच्या पाठीत घुसली, अखेर मित्राला घेतले ताब्यात

---Advertisement---

जळगाव : दूध फेडरेशन परिसराजवळ एक धक्कादायक घटना घडली असून, भुसावळ येथे एका कार्यक्रमातून परत येत असताना कारमध्ये मागे बसलेल्या मित्राने केलेल्या गोळीबारात पुढच्या सीटवर बसलेला दुसरा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जखमीवर शासकीय महाविद्यालय वैद्यकीय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

नाजीम फिरोज पटेल (वय २५, रा. पाळधी, ता. धरणगाव) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. नाजीम हा त्याचा मामा बाबलू उर्फ मजहर पटेल (वय २४, रा. पाळधी), मित्र तोहीत देशपांडे (वय २३) तसेच अल्ताफ सुलेमान शेख (वय २४) यांच्यासोबत मामाच्या कारमधून (क्रमांक एमएच १९, क्यू ७५१४) भुसावळ येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते.

कार्यक्रम आटोपून हे चौघे जण मध्यरात्रीनंतर अंदाजे २:१५ वाजता जळगाव रेल्वे स्टेशनकडून पाळधीकडे परत येत होते. गाडी मामा बाबलू चालवत होता, तर नाजीम त्याच्या बाजूच्या सीटवर आणि तोहीत व अल्ताफ मागील सीटवर बसले होते. गाडी दूध फेडरेशनजवळ आल्यानंतर ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे.

प्रवास सुरु असताना, दूध फेडरेशनजवळ प्रवासादरम्यान, अचानक गाडीत मागून गोळी फायर झाल्याचा आवाज आला आणि मागच्या सीटवर बसलेल्या तोहीतच्या हातातून सुटलेली गोळी थेट नाजीमच्या पाठीच्या उजव्या बाजूला घुसली. वेदनेमुळे नाजीमने आरडाओरड केल्यावर मामा बाबलूने त्वरित गाडी थांबवली. इतर मित्रांनी लागलीच जखमी नाजीमला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे तोहीतने हे पिस्तूल कुठून तरी बेकायदेशीर मार्गाने मिळवले होते. गाडी चालताना निष्काळजीपणे पिस्तूल हाताळत असताना त्यातून अचानक गोळी सुटली आणि ती त्याच्या पाठीत लागली. ही गोळी नाजीमच्या मणक्यात अडकली आहे. नाजीमवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. शहर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत. तोहीत देशपांडे याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात असून, बेकायदेशीर पिस्तूल तोहीतला कोणी आणि कसे पुरवले, याचाही तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment