जळगाव : जळगाव शहरात विविध कारणांवरून तिघांना मारहाण, एकास चॉपरने मारण्याची धमकी देण्यात आली. तर गांजा सेवन करणाऱ्या दोन जणांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जळगाव : आत्या व शेजारील व्यक्तीचे सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या हर्षल रवींद्र शिंदे (१८. रा. खेडी, ता. जळगाव) या तरुणावर चाकूने वार करण्यात आला. ही घटना ११ मे रोजी शेळगाव येथे घडली. या प्रकरणी तरुणाने नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून वार करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउनि अलिपार खान करीत आहेत.
मद्यपींकडून किराणा व्यावसायिकास मारहाण
जळगाव : दारूच्या नशेत किराणा दुकानावर येऊन हर्षित नंदलाल जैन (२०) यांच्यासह त्यांचे वडील नंदलाल जैन, आई ममता जैन, काका पत्रालाल जैन यांना दोन जणांनी मारहाण केली. ही घटना १५ मे रोजी तालुक्यातील जळके येथे घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. प्रदीप पाटील करीत आहेत.
किरकोळ कारणावरून एकास मारहाण
जळगाव : लहान मुलांच्या भांडणाचा जाब विचारल्याने रवींद्र प्रेश सपकाळे (४०. रा. आहुजा नगर) यांना दोन जणांनी मारहाण केली. ही घटना १५ मे रोजी आहुजा नगरात घडली. या प्रकरणी सपकाळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आत्ता आहे. पुढील तपास गुलाब माळी करीत आहेत.
एकास चॉपरने मारण्याची धमकी
जळगाव : रस्त्यात उमे असल्याचा राग येऊन प्रवीण रमेश कोळी (३०, रा. जैनाबाद) याने वाहीद गुलशेल पिंजारी (३३, रा. जैनाबाद) यांना शिवीगाळ करीत चॉपरने मारण्याची धमकी दिली. ही घटना १५ में रोजी जैनाबाद परिसरात घडली. या प्रकरणी पिंजारी यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अदखलपात्र गुन्ह्याची नौद करण्यात आली आहे.
गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर कारवाई
जळगाव: गांजा सेवन करणाऱ्या दोन जणांवर कारवाई करण्यात आली. संतोष सोमा हटकर (४५, रा. तांबापुरा) हा मेहरुण बगीचा परिसरात गांजा सेवन करताना आढळला. तर चेतन ललित चौधरी (२२, रा. कानळदा रोड) हा तरसोद फाट्याजवळ गांजा सेवन करताना आढळला. दोघांविरुद्ध अनुक्रमे एमआयडीसी पोलीस ठाणे व नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आता आहे.