जळगाव : मित्राच्या बहिणीसोबत इंस्टाग्रामवर चॅटिंग का केली, असा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन जणांना चौघांनी शिवीगाळ करत लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना शनिवारी (१७मे) बाबा नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनमोल घनश्यामदास मंधवाणी (२८, रा. आदर्श नगर) याने ‘माझ्या मित्राच्या बहिणीसोबत इंस्टाग्रामवर चॅटिंग का केली’, असा जाब विचारला. त्यावरून चार जणांनी अनमोल व त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. तसेच हाता, पायाला, पाठीवर लोखंडी पाईपने मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
दोन कारची समोरा-समोर धडक
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे दोन कारची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कुसुंबा रोड भागात राहणारे अब्दुल कुडूस मोहंमद इस्माइल हे कारने इतर तिघांसह छत्रपती संभाजीनगर येथे विवाहासाठी जात होते.
पिलखोडपासून दोन किलोमीटर अंतरावर समोरुन वेगात आलेल्या कारने त्यांच्या कारला जबर धडक दिली. या अपघातात अब्दुल कुडूस व अतीक अहमद अब्दुल खालिक यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक फरान व अल्ताफ अनाजवाला हे दोघे जखमी झाले. दोघा जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, कारमधील काही जण जखमी असून त्यांच्यावर चाळीसगावला उपचार सुरू आहे.