Girish Mahajan: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहीलं आहे. या पत्रातून ऑरेशन सिंदूरनंतर राज्यात जो जल्लोष साजरा केला जातोय त्याबाबत अमित ठाकरेंनी खंत व्यक्त केली आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेचे निर्णय घेतले त्याबद्दल अमित ठाकरे यांनी या पत्रातून पंतप्रधानांचे आभार मानले आहेत, मात्र ‘ सध्याची स्थिती विजयाची नसून युद्धविरामाची ( seasefire) आहे, त्यातच जवानांचे प्राण देखील गेलेत. अशा स्थितीत विजय साजरा करणे अनेकांच्या मनाला वेदना देणारं’ असल्याचं अमित ठकारेंनी लिहीलं आहे.
अमित ठाकरे यांचं पत्र
अमित ठाकरे यांच्या या पत्रावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी टीकास्त्र डागले आहे. तसेच हे पत्र फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी असल्याचे मंत्री महाजन यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन ?
अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेलं पत्र प्रसिद्धीसाठीचे पत्र असून हा बालिशपणा आहे. संपूर्ण देशाने आणि जगाने बघितले आपण काय केलं म्हणून? तुम्हाला त्याबाबतही काही शंका आहे का? असा सवाल यावेळी गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, संपूर्ण जगाने पाहिले, आमच्या सैन्याने काय केलं आणि तुम्हाला आता काय त्याचा रिझल्ट पाहिजे, संपूर्ण बालिशपणा चालला आहे हा, प्रसिद्धीसाठी असे पत्र लोक का लिहितात? मला काही कळत नाही, असं पत्र लिहिण्याची काहीच आवश्यकता नाहीये, असा टोला यावेळी मंत्री महाजन यांनी लगावला आहे.