---Advertisement---

‘मुलांसाठी ये’, भावनिक साद घातल्यावर परतली पळालेली विवाहिता

---Advertisement---

जळगाव : तीन विवाहित महिला व दोन तरुणी रफूचक्कर झाल्याची घटना गत आठवड्यात बोदवड तालुक्यात उघडकीस आली होती. यापैकी एक विवाहिता तर दोन लहान मुलांना सोडून प्रियकरासोबत निघून गेली होती. पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधत मुलांबद्दल भावनिक साद घातल्यावर ती घरी परतली आहे.

बोदवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांनी मोबाइल लोकेशन शोधून सदर महिलेशी संपर्क साधला. यावेळी तिला ‘मुलांसाठी ये’ अशी भावनिक साद घालत तिच्या प्रियकराच्या भूलथापांच्या सापळ्यातून बाहेर काढले. यानंतर ही महिला सोमवारी रात्री भुसावळ येथून परत आली. आपल्या आईला व पत्नीला घेण्यासाठी मुले व पती बोदवड पोलिस ठाण्यात रात्री बसून होते. ती आल्यावर पोलिस उपनिरीक्षक सुजित पाटील यांच्या मध्यस्थीने ती घरी परतली.

दोनपैकी एक अल्पवयीन तरुणी

पळून गेलेल्या दोन तरुणींपैकी एक अल्पवयीन, तर एक २२ वर्षीय तरुणी आहे. या दोन्ही तरुणींबाबत बोदवड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. तर तीनपैकी दोन विवाहितांची हरविल्याची नोंद आहे. एका विवाहितेबाबत मात्र नोंद नाही.

हळदीच्या कार्यक्रमातच तरुणावर हल्ला

धुळे : हळदीच्या कार्यक्रमात नाचत असतानाच तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना सोमवारी शिरपूर तालुक्यातील नांथे गावात घडली. या प्रकरणी तिघांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिरपूर तालुक्यातील नांथे गावात सुरेश राजपूत यांच्या मुलीचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. सोमवारी नाचत असताना पाठीमागून येऊन एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. काही कारण नसताना अचानक अशा प्रकारची घटना घडल्याने हळदीच्या कार्यक्रमात शांतता पसरली. दरम्यान, जखमी झालेल्या दोघा-तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी जयपालसिंग राजपूत (वय २१) याने थाळनेर पोलिस ठाण्यात २० मे रोजी दुपारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित रोहित रंजित गिरासे, चिराग रंजित गिरासे आणि मयूर धनगर (सर्व रा. क्रांतीनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment