---Advertisement---

बापरे ! धुळ्यातील विश्रामगृहात तब्बल पावणेदोन कोटींची रोकड, उडाली खळबळ

---Advertisement---

धुळे : विधीमंडळाच्या आमदाराच्या समितीतील सदस्यांना देण्यासाठी गुलमोहर या शासकीय विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत साडे पाच कोटी रुपये ठेवले असल्याचा खळबळजनक आरोप धुळ्याचे माजी आमदार तथा उद्धव सेनेचे नेते अनिल गोटे यांनी बुधवारी केला. रात्री उशीरापर्यंत संबंधीत कुलूप बंद खोली बाहेर ठिय्या मांडला. त्यानंतर रात्री उशिरा या खोलीचे इन कॅमेरा कुलुप उघडून तपासणी सुरू होती.

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेत बुधवारी आमदारांची समिती अभ्यास दौऱ्यावर आलेली आहे. धुळ्यात बुधवारी सकाळी समितीचे २९ पैकी ११ आमदार दाखल झाले. या समितीतील आमदारांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी साडे पाच कोटी रुपये गोळा केले असून ते विश्रामगृहाच्या १०२ क्रमांकाच्या खोलीत ठेवले आहेत, असा आरोप गोटे यांनी केला.

खोतकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील याच्या नावाने १५ मे पासून ही खोली आरक्षित करण्यात आली असल्याचा देखील आरोप गोटे यांनी केला. खोलीला लावण्यात आलेले कुलूपही खासगी व्यक्तीचे असल्याचा संशय गोटेंनी व्यक्त केला होता. याबाबत बराच वेळ चर्चा झाल्यानंतर अखेर रात्री उशिरा खोलीचे इन कॅमेरा कुलुप उघडण्यात आले.

यासंदर्भात समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याशीही वारंवार संर्पक साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध नाहीत. होऊ शकले नाहीत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment