---Advertisement---
Construction Worker Scheme : केंद्र व राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. या योजनांमधून त्यांना आर्थिक सुरक्षा, मुलांचं शिक्षण, आरोग्य आणि कुटुंब आधार म्हणून मदत दिली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथक नोंदणी करणे आवश्यक असते. परंतु नोंदणी करण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. ‘त्या’ नेमक्या कोणत्या आहेत चला जाणून घेऊया.
केंद्र व राज्य सरकारने तयार केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय १८ ते ६० वर्षे असावे. बांधकामाशी संबंधित (मजुरी, सुतारकाम, लोहारकाम, प्लंबर वगैरे) काम करत असणे आवश्यक. आधार कार्ड, बँक खाते, रेशन कार्ड आणि राहणीचा पुरावा आवश्यक. तसेच ९० दिवसांच्या कामाचे कागदपत्र आवश्यक आहे. या सर्व गोष्टीत तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला ऑनलाइन (या संख्येत स्थळावर https://mahabocw.in/) किंवा जवळच्या कामगार कार्यालयात नोंदणी करता येईल. नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला ओळखपत्र दिले जाईल. त्यानंतर पात्र योजनेचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील.
कोणत्या आहेत योजना
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण), कौशल्य वृद्धीकरण योजना, आरोग्य योजना, विमा योजना, शिक्षण योजना, पेंशन योजना, भांडी सेट योजना, अश्या विविध योजना सरकारने सुरु केल्या आहेत.
काय आहेत फायदे
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना ६० वर्षांनंतर मासिक निवृत्ती वेतन. आवश्यक असेल तेव्हा २,००० ते ५,००० रुपये. दिवाळीला बोनस म्हणून काही पैसे मिळू शकतात. मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत. लग्न आणि कुटुंबासाठी आर्थिक मदत. घरकामासाठी आवश्यक वस्तू (ताट, वाटी, भांडी वगैरे) मोफत मिळतात. घरासाठी आर्थिक मदत. आरोग्य सुरक्षा आर्थिक मदत. नवीन काम शिकण्यासाठी प्रशिक्षण. महिला कामगारांना प्रसूतीसाठी आर्थिक मदत. कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत.
महत्वाची माहिती
केंद्र व राज्य सरकारने सुरु केलेल्या काही योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित विभागाची चौकशी करून नोंदणी करा. नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला ओळखपत्र दिले जाईल. पात्र योजनेचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील.