---Advertisement---

पुजाऱ्यास चाकूचा धाक दाखवून लुटले, गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव : वरणगाव येथील बोदवड रोडवरील पुरातन व जागृत असलेल्या नागेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना २१ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

पुजारी रामेश्वर उखडू भोपळे (६८) हे मंदिराजवळच्या रूममध्ये बुधवारी रात्री नऊच्या सुमारास झोपले असताना २० ते २२ वयोगटातील चार ते पाच अनोळखी युवक तेथे आले व त्यांनी दरवाजावर लाथा मारून दरवाजा उघडण्यास भाग पाडले.

त्यातील एका युवकाने त्यांना उद्यानाकडे नेले व चाकू लावून त्यांच्या खिशातून रोख रक्कम व चाब्यांचा गुच्छा हिसकावून मारून टाकण्याची धमकी दिली. यावेळी वीजपुरवठा खंडित झाला होता.

नंतर वीजपुरवठा सुरू होताच हे युवक सिध्देश्वर नगरच्या दिशेने पळून गेले. याबाबत वरणगाव पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोदामाला आग, लाखोंचे नुकसान

अमळनेर : नगरपालिकेसमोरील एका पत्री गोदामाला गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गोदामातील साहित्य जळून खाक झाले. तातडीने अग्निशमन बंब मागवण्यात आला. दुकाने बंद होती आणि आतून आग लागल्याने आग विझवण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. गोदामात असलेल्या पाण्याच्या बाटल्या, मिक्सर, पाण्याचे जार, भांडे असे लाखोचे साहित्य जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी पालिकेचे जेसीबी मागवून दुकानांचे शटर तोडण्यात आले पालिकेसमोरील हे गोदाम अशोक हरिराम पबून यांच्या मालकीचे असून शामलाल ठवरमल थावराणी यांनी गहाण ठेवले होते. दुकानाचा माल येथे ठेवत असत. याठिकाणी विद्युत पुरवठाही नव्हता. मात्र सकाळी कुणीतरी जवळच कचरा जाळला होता.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment