---Advertisement---

अनैतिक संबंधाचा संशय; चोपड्यात एकाला थेट संपवलं, काही तासांतच आरोपीला अटक

---Advertisement---

जळगाव : चोपडा शहरातील पं.स. सभापती निवास असणाऱ्या स्थळी एका अज्ञाताचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, हा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून झाल्याचे समोर आले असून, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप व पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी काही तासांतच आरोपीस अटक केली आहे.

चोपडा शहरात कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणारे दोन पुरुष व एक स्त्री हे सोबत कचरा गोळा करतात. यापैकी मृत व्यक्ती आणि सोबत असणारी जानू राजू बारेला (३५) यांचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात ठेवत राजेश काशीनाथ बारेला याने मृताच्या डोक्यात दगड मारून खून केला तसेच जानू बारेला हिलादेखील मारहाण करून जखमी केल्याची घटना २५ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली होती.

पंचायत समितीसमोर असणाऱ्या सभापती निवासाच्या प्रांगणात एका अज्ञाताचा मृतदेह पडल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी तपासकामी चार पथके तयार करून धरणगाव, पारोळा आदी ठिकाणी पाठवली. मात्र, चार तासांत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपी राजेश काशीराम बारेला (३३, चाचऱ्या, ता. सेंधवा) या आरोपीस गोरगावले रोडवरून ताब्यात घेत त्याला अटक केली आहे. हा खून अनैतिक संबंधातून झाला असून, मृताची अद्याप ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बकऱ्यांच्या कळपावर हिंस्र प्राण्याचा हल्ला, ११ बकऱ्या ठार

पाचोरा : शहरालगत असलेल्या कृष्णापुरी शिवारातील शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या बकऱ्यांच्या कळपावर हिंस्र प्राण्याने सकाळी हल्ला करीत अकरा बकऱ्यांना ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे.

कृष्णापुरी शिवारात पुरुषोत्तम महाजन व अविनाश महाजनयांच्या मालकीच्या गट नं. २७/२ या शेतातील कंपाउंडमध्ये असलेल्या शेळ्यांच्या कळपावर सकाळी ७च्या सुमारास हिंस्र प्राण्याने हल्ला करीत ११ बकऱ्यांना ठार केले. यामुळे शेळीपालकाचे अंदाजे ९० हजारांपर्यंत नुकसान झाले आहे.

पुरुषोत्तम महाजन हे सकाळी घराकडे गेले होते. त्यावेळी सर्व बकरी, गायी, म्हशी गोठ्यामध्ये सुरक्षित होत्या. मात्र, घराकडून परत शेताकडे आल्यानंतर ९ वाजेच्या सुमारास शेतात आले असता बकऱ्यांवर हिंसक प्राण्याचा हल्ला झाल्याचे दिसून आले.

यावेळी वनविभागाचे नांद्रा परिक्षेत्रातील वनपाल प्रकाश देवरे यांनी पाहणी केली. पुरुषोत्तम महाजन यांच्या मालकीच्या ७ बकऱ्या व तेथून ५० मीटर अंतरावरील अविनाश राजाराम महाजन यांच्या मालकीच्या ४ बकऱ्या ठार झाल्याचे दिसून आले. २ ते ३ लांडग्यांनी हा हल्ला केल्याचा अंदाज वनपाल प्रकाश देवरे यांनी व्यक्त केला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment