---Advertisement---

बाळाचा मृत्यू; डॉक्टरासह परिचारिकेला मारहाण, पोलिसात तक्रार दाखल

---Advertisement---

नंदुरबार : दोन महिन्यांच्या वाळाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा संशय घेऊन नातेवाइकांनी महिला डॉक्टर व परिचारिकेला मारहाण करून खासगी दवाखान्याची तोडफोड केल्याची घटना नवापुरात शनिवारी घडली. याप्रकरणी महिला तक्रारीवरून पोलिसांत डॉक्टरच्या नवापूर संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

डॉ. रिजवाना पिरजादा यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी मोहम्मद अब्रार खाटीक (वय २ महिने) या बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बाळाची प्रकृती ठीक असल्याने डॉक्टरांनी त्याला दुपारी डिस्चार्ज दिला. मात्र, सायंकाळी बाळाची तब्येत अचानक खालावली व त्याला फिट्स येऊ लागल्याने नातेवाइकांनी त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणले, तेव्हा डॉक्टरांनी तपासणी करून बाळ मयत झाल्याचे घोषित केले.

बाळाच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कार करण्यात आले. मात्र, शनिवार, २४ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वाळाचे १० ते १२ महिला, पुरुष नातेवाईक अचानक हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी डॉ. रिजवाना यांच्याकडे बाळाच्या मृत्यूबाबत चौकशी सुरू केली. त्यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि तो वाद हल्ल्यात परिवर्तित झाला. डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर हात उचलण्यात आला तसेच हॉस्पिटलच्या काही वस्तूंची तोडफोड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास नवापूर पोलिस करीत आहेत.

दरम्यान, मृत बाळ मोहम्मद अब्रार खाटीकच्या नातेवाइकांनी यावर आपली बाजू मांडताना सांगितले की, आमचे हे बाळ दोन महिन्यांचे होते. बाळाला काही त्रास नव्हता आणि अचानक मृत्यू झाल्याने आम्ही डॉक्टरांकडे स्पष्टीकरण मागत होतो. डॉक्टरांनी बेजबाबदारपणे उत्तर दिले. आम्ही केवळ चौकशी करत होतो, कुठलीही तोडफोड केली नाही व कुणीही डॉक्टरवर हात उचलले नसल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment