---Advertisement---

भरधाव दुचाकीस्वाराची पादचाऱ्यास धडक, दोघे ठार

---Advertisement---

धुळे : अज्ञात भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी ठार, तर दुचाकीस्वाराचाही गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील कालापाणी पाड्याजवळ घडली. सुमित राजेश बोरसे (वय २९) व तुळशीराम नाजल्या पावरा (वय ४९, रा. हाडाखेडा) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

संजय नाजल्या पावरा (वय ३८, रा. हाडाखेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास वरील ठिकाणी दुचाकीस्वार सुमित राजेश बोरसे याने भरधाव दुचाकी चालवत पादचारी तुळशीराम नाजल्या पावरा यांना धडक दिली. या सुमित बारेसेसह पादचारी तुळशीराम पावरा या दोघांना मृत्यू झाला. याप्रकरणी मृत सुमित बोरसे याच्याविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला.

शेतातून घरी येताना झाला अपघात

मृत तुळशीराम नाजल्या पावरा हे मूगाला पाणी भरण्यासाठी गेले होते, संध्याकाळी घरी येत असताना दुचाकीचालक सुमित राजेश बोरसे यांनी दुचाकीने जोरदार धडक दिल्याने पावरा यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच हाडाखेड येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

परिवाराशी भेट अपूर्ण

सुमित बोरसे हा काही वर्षापासून शिरपूर तालुक्यात एका खासगी ठिकाणी कामाला होता. रविवारी कामावरून सुटी घेऊन आपल्या परिवाराला भेटण्यासाठी सेंधवा येथे दुचाकीने जात होतो. दुचाकीने घरी जाण्याच्या गडबडीत सुमित बोरसे यांचा अपघात झाला.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment