---Advertisement---

धक्कादायक ! सोशल मीडियावर ओळख, जळगावातील हॉटेलात नेऊन तरुणीवर अत्याचार

---Advertisement---

जळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोदवड शहरातील एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीची २२ वर्षीय तरुणी बाहेरगावी शिक्षण घेत होती. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरव मुकुंदा साठे (वय २३, रा. बोदवड) याने ओळख निर्माण करून या तरुणीवर जळगाव येथे एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला. एवढेच नव्हे तर त्याने अत्याचार करत असतानाचे फोटो काढले व व्हिडीओही केला. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणीकडून वेळोवेळी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून रक्कमही उकळली.

दरम्यान, वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीने त्रासून या तरुणीने याबाबत तिच्या आईकडे कैफियत मांडली. यानंतर आई व वडिलांनी तरुणीला विश्वासात घेतले असता तिने सर्व माहिती त्यांना दिली. ही माहिती बोदवड पोलिसांना दिली असता, रात्री उशिरापर्यंत या बाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, तरुणीच्या आई-वडिलांना व मुलाला जिवे ठार करण्याची धमकीही आल्याचे सांगण्यात आले. हा गुन्हा जलगाव पोलिसांच्या हद्दीत घडल्याने याबाबत शून्य क्रमांकने गुन्हा जळगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

शिक्षिकेचा पत्ता न दिल्याने मारहाण

जळगाव : आव्हाणे रोड परिसरातील रोहनवाडीत एका महिलेला शिक्षिकेचा पत्ता न दिल्याच्या रागातून चार महिलांनी घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिसांत चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनंदा आनंदा निकम (वय ५७, रा. रोहनवाडी, आव्हाणे शिवार) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मंगल मुरलीधर सुरवाडे, अश्विनी शालिक सुरवाडे, गीता धनराज वाघ आणि सरिता संजय दांडगे (सर्व रा. महादेव नगर) या चार महिला त्यांच्या घरात घुसल्या. त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment