---Advertisement---

स्वयंसहायता बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर, जाणून घ्या अटी व शर्ती

---Advertisement---

धुळे : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून योजनेंतर्गत ९० टक्के शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत गटांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त संजय सैदाणे यांनी केले आहे.

योजनेचा उद्देश स्वयंसहायता बचत गटांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे हा असून, लाभार्थ्यांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर, ट्रेलर, कल्टिव्हेटर किंवा रोटाव्हेटरसह पुरवले जाणार आहेत. यासाठी कमाल ३.५० लाख रुपयांच्या किमतीपर्यंत साहित्य खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ९० टक्के म्हणजेच ३.१५ लाख रुपये अनुदान शासनाकडून दिले जाईल, तर उर्वरित १० टक्के (३५ हजार रुपये) बचतगटाने भरायचे आहेत.

शासकीय अनुदान दोन टप्प्यात देण्यात येईल. ५० टक्के साहित्य खरेदीचे पुरावे सादर केल्यानंतर आणि उर्वरित नोंदणी झाल्यानंतर मिळेल. प्रस्तावांची निवड पात्र अर्जाच्या संख्येवर आधारित लॉटरी पद्धतीने केली जाईल. अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंचन भवन मागे, साक्री रोड, धुळे या पत्त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत पाठवायचा आहे, असे आवाहन सैदाणे यांनी केले आहे.

योजनेतील अटी व शर्ती

गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती / नवबौद्ध घटकांचे असणे आवश्यक. अध्यक्ष व सचिव हे देखील या घटकांतील असावेत. गटाचे बँक खाते राष्ट्रीयीकृत बँकेत असावे व आधार क्रमांकाशी संलग्न असावे. गटाच्या नावाने पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment