---Advertisement---
धुळे : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदखेडाच्या एका गावातील अल्पवयीन मुलीस अपहरण करीत संशयिताने तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दि. २१ रोजी सायंकाळी सातला राहत्या घरातून पीडीतेस अपहरण करीत संशयिताने तिच्यावर पाळधीत महाविद्यालयानजीक अत्याचार केले. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसात संशयिताविरूध्द अपहरणासह पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल असून तपास सहायक निरीक्षक अविनाश गहिवड करीत आहेत.
प्रेयसीची आत्महत्या; प्रियकराविरोधात गुन्हा दाखल
नंदुरबार : आजारपणामुळे प्रियकर सातत्याने टोचून बोलत असे. या छळाला कंटाळून प्रेयसीने आत्महत्या केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील बामणी येथे घडली. जेबाबाई नरपतसिंग पाडवी (३९) रा. डनेल ता. अक्कलकुवा असे मयत महिलेचे नाव आहे.
जेबाबाई ही प्रियकर सिपा नानजी पाडवी (४०) याच्यासोबत डनेल गावात राहत होती. आजारपणामुळे सिपा हा तिला सातत्याने टोचून बोलत होता. यामुळे ती बामणी येथे राहणाऱ्या भावाकडे गेली होती.
---Advertisement---
याठिकाणी २५ मे रोजी जेबाबाईने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी कुसा टुडा वसावे यांनी मोलगी पोलिस ठाण्यात सिपा याच्याविरोधात महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---