---Advertisement---
---Advertisement---
वैभव करवंदकर
नंदुरबार : जिल्ह्यात राजकीय क्षेत्रातून मोठी समोर आली आहे. धडगावच्या सहा गावातील ग्रामस्थांनी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला असून, यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. विशेषतः जिल्ह्याच्या इतिहासात असे प्रथमच घडले असून, हा राजकीय भूकंप मानला जात आहे.
धडगाव तालुक्यातील बोरी येथे दि. 8 जून 2025 रोजी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा जम्बो स्वरूपातील पक्षप्रवेश पार पडला. धडगाव तालुका हा काँग्रेसचे विद्यमान खासदार गोवाल पाडवी, माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. तसेच एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार आमश्या पाडवी यांच्या विधानसभा क्षेत्रातील ही प्रमुख गावे आहेत. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता स्थानिक ग्रामस्थांमध्ये या दोन्ही नेतृत्वाबद्दल किती नाराजी आहे हे अधोरेखित होत असून, गावित गटाने आज मोठा राजकीय धक्का दिला आहे; असा दावा भाजप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला.
दरम्यान, जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात मागील अनेक वर्षांपासून गाव-पाड्यांवर कुठलाही विकास काँग्रेसचे आमदारांनी तसेच विद्यमान आमदारांनी केला नाही. यामुळे या अतिदुर्गम भागातील बोरी, चिखली, बिलगाव, गेंदा, माळ, सावऱ्यादिगर, गुंडान चाफळा या गावातील काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील केवळ पंधरा-वीस कार्यकर्त्यांनी नव्हे तर संपूर्ण गावाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाच्या ठिकाणी पक्षप्रवेशासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या आणि शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित राहिल्या.
प्रवेश करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी याप्रसंगी सांगितले की, या अतिदुर्गम भागातील गावांना रस्ते पाणी वीज सारख्या प्राथमिक सुविधा मिळाव्या यासाठी 35 40 वर्षापासून प्रतीक्षा केली जात आहे परंतु स्थानिक आमदारांनी कधीही बदल घडवला नाही परंतु आता मोदी सरकारकडून तसेच डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडून अपेक्षा असल्याने आम्ही राजकीय बदल घडवण्याची ही भूमिका घेतली आहे. आम्हाला डॉ. विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यावर त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीवर विश्वास असल्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश केला आहे असेही प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख भाषणात डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले की, अतिदुर्गम भागाचा कायापालट घडावा या उद्देशानेच आपण जिल्हा निर्मिती घडवली होती तेव्हापासून आरोग्य शिक्षण रस्ते वीज पाणी सर्व सुविधा आदिवासी गावांना मिळवून देण्यासाठी झटत आलो आहोत अनेक गाव पाड्यांचा कायापालट घडवला तसा या भागाला देखील नक्कीच न्याय मिळवून देईल अशी ग्वाही याप्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष दीपक पाटील धडगाव तालुकाध्यक्ष पिंट्या पावरा सामाजिक कार्यकर्ते सुभाष आप्पा पावरा भीमसिंग पाडवी माजी नगराध्यक्ष लतिष मोरे रमेश वसावे बोरी गाव ग्रामपंचायत सदस्य रेल्या पावरा सुकलाल पावरा शिवाजी पावरा रायसिंग पावरा प्रताप पावरा सीमा पावरा गोविंद पावरा गण्या पावरा आकाश पावरा हेमंत पावरा विशाल पवार सरपंच दिलीप पावरा बिभीषण पावरा आदी उपस्थित होते.