---Advertisement---
Viral News : पत्नी वारंवार पळून जात असल्याने तणावात असलेल्या पतीने आयुष्याची दोर कापल्याची घटना समोर आली आहे. गोवर्धन असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याचे सात वर्षांपूर्वी प्रिया नावाच्या महिलेची लग्न झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, गोवर्धन याचे सात वर्षांपूर्वी प्रिया नावाच्या महिलेशी लग्न, दोघांनाही दोन मुले आहेत. पत्नी प्रिया ही काही एक न सांगता वारंवार घरातून पळून जात असे. ती एक महिन्यापूर्वीही घर सोडून गेली होती. पत्नीच्या या प्रकाराला कंटाळून गोवर्धनने आयुष्याची दोर कापली.
गोवर्धन आणि पत्नी प्रिया हे रामनगरमच्या अग्रहारा गावातील १२व्या मेन रोडवरील घरात राहत होते. तर गोवर्धनची आई तळमजल्यावर राहते. दरम्यान, गोवर्धनची पत्नी प्रिया पुन्हा पळून गेल्याने तो एकटाच होता. पत्नीच्या पळून जाण्याने तणावात असलेला गोवर्धनने ८ जून रोजी आयुष्याची दोर कापून घेतली.
त्याची आई त्याला जेवण देण्यासाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर
त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी व्हिक्टोरिया रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, कुटुंबाने त्याच्या मृत्यूसाठी त्याची पत्नी प्रियाला जबाबदार धरले आहे. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.