आमदार मंगेश चव्हाणांची रायगड वारी; एकनाथ शिंदेकडून कौतुक

---Advertisement---

 

चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांची अविरत सुरू असलेल्या रायगड मोहीम हि निश्चित युवकांना शिवसंस्कार देणारे असून चव्हाणांचे कार्य खरंच अद्वितीय आहे, असे कौतुक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते मुख्य शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी माध्यमांशी बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून ७ ते १० जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेली ‘रायगड मोहीम -२०२५ यंदाही उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात पार पडली. या मोहिमेद्वारे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील हजारो शिवभक्त, विद्यार्थी आणि तरुणाईने रायगडाचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवला. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या ऐतिहासिक मोहिमेचे यंदाचे आयोजन अधिक भव्य स्वरूपात झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधीश रूप व भव्य-दिव्य दुर्गराज रायगडचे स्वरूप मनात साठवत चाळीसगाव तालुक्यातील हजारो शिवभक्तांचा ताफा आज भल्या पहाटे चाळीसगाव येथे सुखरूप परतला व रायगड मोहिमेची यशस्वी सांगता झाली.

रायगडावरील मुख्य शिवराज्याभिषेक सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भारत गोगावले यांनी आपल्या भाषणातून हजारो शिवभक्तांसमोर मंगेशदादांच्या उपक्रमाचे खुलेपणाने कौतुक केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मंगेश दादा चव्हाण यांची रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार, राष्ट्रभक्ती आणि स्वराज्याच्या मूल्यांचे प्रत्यक्ष धडे देणारे अद्वितीय कार्य आहे. अशा मोहिमा हेच खरे शिवराज्याचे जिवंत रूप आहेत.” अश्या शब्दात त्यांनी मोहिमेचे कौतुक केले.

मोहिमेत सहभागी झालेल्यांसाठी राहण्याची, भोजनाची आणि प्रवासाची उत्तम सोय करण्यात आली होती. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हरवंडी आश्रम येथे मुक्कामी १२०० हून अधिक शिवभक्तांसाठी चहा-नाश्ता, आंघोळ, स्वच्छतागृहे, आणि दोन वेळेचे भोजन या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या सर्व रायगड प्रवासात आमदार मंगेश दादा चव्हाण व पत्नी प्रतिभाताई चव्हाण हे शिवप्रेमी यांच्या सोबतच होते व त्यांनी लावलेली एकूणच व्यवस्था पाहता शिवप्रेमींची कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच ते दोघींनाही हातात हात घेऊन काळजी घेतली. यासाठी गेल्या महिनाभरापासून भाजपा व शिवनेरी फाउंडेशनचे पदाधिकारी देखील अहोरात्र परिश्रम घेत होते.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेली शौर्याची रात्र, आमदार मंगेश चव्हाण यांचा तरुणाईला मोलाचा संदेश

मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी रात्री हरवंडी येथे सुप्रसिद्ध शिवशाहीर चंद्रकांत माने यांच्या शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून शिवचरित्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उभ्या तरुणाईपर्यंत पोहोचवण्यात आला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना उद्या आपण ज्या रायगडावर जाणार आहोत तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श आचरणाचा व राज्यकारभाराचा सर्वोच्च प्रतिक आहे. त्यामुळे तिथे वावरताना आपले आचरण देखील तसेच ठेवत जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुल्यांवर चालण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले,

रायगडावर प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळा

१० जून रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे दर्शन घेताना हजारो शिवभक्तांनी ‘राजा शिवछत्रपती की जय’ च्या गजरात रायगड गड निनादवून सोडला. आमदार मंगेश चव्हाण यांनी गडावर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि उपस्थितांना स्वराज्य, शिस्त, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश दिला.

पाच वर्षांची यशस्वी परंपरा

ही मोहीम सालाबादप्रमाणे सलग पाचव्या वर्षी यशस्वीरीत्या पार पडली असून, आमदार मंगेशदादांनी आपल्या प्रयत्नातून आतापर्यंत १६ हजाराहून अधिक तरुणांच्या मनात शिवप्रेम जागवले आहे. मतदारसंघातील युवकांना इतिहासाची जाणीव, संस्कार आणि संघटन यांचा अनुभव देणारी ही मोहीम भविष्यातही अधिक जोमाने राबविण्याचे आमदार चव्हाण आश्वासन दिले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---