Shubanshu Shukla : शुभांशू शुक्ला आज घेणार अंतराळात झेप

---Advertisement---

 

कॅलिफोर्निया : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोच्या महत्त्वाकांक्षी अॅक्सिऑम-४ मोहिमेंतर्गत अंतराळवीर व भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला बुधवारी (११ जून ) रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५.५२ वाजता नासाच्या केनेडी प्रक्षेपण केंद्रातून स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना होणार आहे. शुभांशू हे अंतराळात जाणारे राकेश शर्मानंतर दुसरे भारतीय आहे.

ही मोहीम १० जून रोजीच होती, मात्र प्रक्षेपणाच्या ठिकाणच्या प्रतिकूल हवामानामुळे ती एक दिवस पुढे ढकलण्यात आली. स्पेसएक्सच्या प्रक्षेपण विभागाचे उपाध्यक्ष विल्यम गर्टेनमायर यांनी सांगितले की, सुरक्षित उड्डाणासाठी आम्ही अनेक बदल केले आहेत.

---Advertisement---

 

भारत, पोलंड आणि हंगेरीचे चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी खाना होतील. अॅक्सिओम-४ मोहिमेतील भागीदारांचे आम्ही आभारी आहोत. ही मोहीम ३८ दिवसांची असून, अंतराळवीर अनेक संशोधन करणार आहे. वातावरणाचा अंदाज घेऊनच बुधवारची मोहीम निश्चित केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---