---Advertisement---
नंदुरबार : शिवसेना (शिंदे गट) विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी हे गोरगरिब आदिवासींच्या जमीन हडप करण्याचे पाप करत आहेत. याशिवाय ते नेहमी विकासाच्या योजना बंद पाडण्यात आग्रही राहतात. यांना विकासाच्या चांगल्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो, तेव्हा महायुती दिसते. मात्र, निवडणुकीवेळी ते कधीही सहकार्य करत नाहीत, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी केला असून, यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आमदार डॉ. विजयकुमार गावित व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाद सुरू आहेत. आता डॉ. गावित यांनी केलेल्या या आरोपांवर आमदार चंद्रकांत रघुवंशी काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकांवर परिणामाची शक्यता
आमदार डॉ. विजयकुमार गावित व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे आगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणूका लक्षात घेता हा वाद कितपत पेटतो की वरिष्ठ स्तरावरून समेट घडविली जाईल; हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.