छत्रपती संभाजीनगर : शरीरसुखाच्या मागणीला नकार दिल्याने १९ वर्षाच्या नराधमाने ३६ वर्षीय महिलेवर कटरने जीवघेणा हल्ला केला. यामुळे पीडितेच्या अंगावर तब्बल २८० टाके घालावे लागल्याची संतापजनक घटना समोर आलीय. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ही संतापजनक घटना घडलीय. पीडित महिला ही रविवार, २ रोजी दुपारी शेतात काम करत होती. दरम्यान, आरोपी अभिषेक याने पीडितेला फोन करून शरीरसुखाची मागणी केली. हे ऐकून पीडितेने संतापात फोन कट केला. पीडिता सायंकाळी शेतातील काम आटपून पांदीच्या रस्त्याने घरी जात होती. त्या वेळी आरोपी अभिषेक हा अचानक पीडित महिलेची वेणी खेचली आणि डोकं दगडावर आपटलं. आरोपी अभिषेक याने पीडितेच्या तोंडावर, गळ्यावर, शरीरावर कटरने सपासप वार केले. त्यानंतर पीडीता बेशुद्ध पडल्याने आरोपीने पळ काढला.
शेताच्या दुसऱ्या टोकाला असलेली सासू घरी जात असताना तिला रस्त्यामध्ये सून रक्तबंबाळ, बेशुद्धावस्थेत आढळली. कुटुंबाने तिला शहरात रूग्णालयात उपचारांसाठी आणले. पीडिता शुद्धीवर आल्यावर तिने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अंगावरती २८० टाके
नराधमाने पीडितेच्या शरीरावर कटरने सपासप वार केले. यामुळे पीडितेच्या अंगावर तब्बल २८० टाके घालावे लागलेत. पीडितेच्या मानेपासून ते कमरेपर्यंत सव्वादोन फुटांचा एक वार आहेत. भयंकर वेदना सहन करत ही पीडिता एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.