जळगावचा २० महिन्याचा चिमुकला दुर्धर आजाराने ग्रस्त, पालकांनी केले मदतीचे आवाहन

---Advertisement---

 

जळगाव : देवांश भावसार (वय २० महिने) या चिमुकल्याला एका दुर्धर आजाराने ग्रासले आहे. त्याच्या उपचारासाठी जवळपास १६ कोटी रुपयांचा खर्च अपक्षीत आहे. या चिमुकल्याच्या उपचारासाठी जळगावकरांनी एकत्र येऊन शुक्रवारी (१५ ऑगस्ट) रोजी मदत फेरीचे आयोजन केले. स्वातंत्र्यदिनानिमित्तजळगाव महापालिका कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत मदत फेरी काढण्यात आली.

देवांशला स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी (SMA) टाइप-२ हा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारामुळे लहान मुलांचे स्नायू कमकुवत होत जातात आणि हळूहळू चालणे, खाणे, अगदी श्वास घेण्याची क्षमता देखील कमी होते. या आजारावर उपलब्ध असलेला एकमेव उपचार म्हणजे झोल्गेन्समा ही जीन थेरपी असून, तिचा खर्च साधारण १६ कोटी रुपये आहे. हा उपचार बालक दोन वर्षांचे होण्याआधी करणे अत्यावश्यक आहे.

देवांशचे पालक मध्यमवर्गीय आहेत. त्यांना हा प्रचंड खर्च परवडणारा नाही. त्यामुळे भावसार कुटुंबाच्या मदतीसाठी जळगावकरांनी पुढाकार घेतला. समाजात जागरूकता निर्माण करून आणि देणगी गोळा करण्याच्या उद्देशाने मदत फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीत सुमारे १५० नागरिक सहभागी झाले.

या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आदी मान्यवरांची भेट घेऊन मदतीची विनंती करण्यात आली. मान्यवरांनी आपल्या परीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अनेक नागरिकांनीही आपल्या क्षमतेनुसार आर्थिक मदत करून पाठबळ दिले.

मदत फेरीत भावसार समाजाध्यक्ष जळगाव शैलेंद्र पांडे, अशोक भावसार, जयेश भावसार, दिपाली भावसार, प्रितेश भावसार, सुमित भावसार, गोपाल भावसार, शेखर भावसार, जैन उद्योग समूहाचे सहकारी श्री. तळेले, श्री. वरंकर, श्री. खान, सतीश अंबेकर, जनता बँक सहकारी श्री. बरूडवाले, मित्र परिवार व समाजबंधू आदींचा सहभाग आणि सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---