India vs Bangladesh 1st T20I । भारत-बांगलादेश टी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. ग्वालियरमधील श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियमवर हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. सूर्यकुमार यादवकडे भारतीय संघाचे नेतृत्व असून ही मालिका म्हणजे भारतासाठी आपली ताकद तपासण्याची संधी आहे. मात्र, मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू शिवम दुबे दुखापतीमुळे तीन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर झाला आहे. निवड समितीने शिवम दुबेच्या जागी युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्माचा संघात समावेश केला आहे.
भारतीय संघात सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग हे अनुभवी खेळाडू असून मयंक यादव, किडीशकुमार रेड्डी व हर्शित या उदयोन्मुख खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. राखीव खेळाडूंची उपयुक्तता तपासण्याची ही चांगली संधी आहे.
भारतीय संघाची रणनीती ठरली असून काल झालेल्या पत्रकार परिषत कर्णधार सूर्यकुमार यादवकने अभिषेक शर्मा व संजू सॅमसन भारताकडून सलामीसाठी उतरतील अशी धोषणा केली. फलंदाजीसाठी ग्वालियरमधील खेळपट्टी चांगली आहे, असेही सुर्यकुमार म्हणाला. ग्वालियरमधील दोन दिवसाच्या सरवानंतर भारतीय संघ आता मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
वेगवान गोलंदाज मयंक यादव व हर्शित राणाला उद्याच्याच सामन्यात संधी मिळू शकते. झिम्बावेविरुद्ध पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्माला छाप सोडण्याची संधी आहे. भारतीय गोलंदाजीची धुरा बहुधा आयपीएलमध्ये १५० किलोमीटर प्रती खास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयंक यादवकडे राहाण्याची शक्यता आहे. त्याच्या सोबतीला राणा, अष्टपैलू हार्दिक पंडया, वॉशिंगटन सुंदर आणि रवी बिष्णोई राहण्याची शक्यता आहे.
संभाव्य भारतीय संघ
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रियान पराग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, वॉश्गिंटन सुंदर, रवी बिष्णोई, मयंक यादव, हर्शित राणा, अर्शदीप सिंग