शेअर बाजाराचा मोठ्ठा विक्रम! 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे उडी

मुंबई : भारतीय शेअर बाजाराने आज नवा टप्पा गाठला आहे. मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईचे बाजार भांडवल 4.1 ट्रिलियन डॉलर्स किंवा 3,33,26,881.49 कोटी रुपये झाले आहे. 4 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त मार्केट कॅपसह भारतीय शेअर बाजार जगातील पाचवी सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. भारतीय बाजाराच्या पुढे अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगचे शेअर बाजार आहेत. गेल्या दोन वर्षात भारतीय शेअर बाजाराने झपाट्याने वाढ केली आहे आणि अल्पावधीतच नवीन उंची गाठली आहे.

भारताची अर्थव्यवस्था सुमारे 3.7 ट्रिलियन डॉलर आहे आणि या आकडेवारीसह, भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तसेच बीएसईचे मार्केट कॅप यापेक्षा 0.4 ट्रिलियन डॉलर्सने वाढले आहे. रँकिंगच्या बाबतीत, भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय शेअर बाजार दोन्ही पाचव्या स्थानावर आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून ते 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत, BSE MCap मध्ये 600 अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे.

पाच सर्वात मोठे स्टॉक मार्केट

अमेरिका: 48 ट्रिलियन डॉलर्स
चीन : 10.7 ट्रिलियन डॉलर
जपान : 5.5 ट्रिलियन डॉलर्स
हाँगकाँग : 4.7 ट्रिलियन डॉलर्स
भारत : 4.1 ट्रिलियन डॉलर