---Advertisement---
तरुण भारत लाईव्ह । २० फेब्रुवारी २०२३। चित्रपटसृष्टी मधून एक वाईट बातमी समोर येतेय. कन्नड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसके भगवान यांचे आज निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी बंगरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भगवान यांनी त्यांचे मित्र दोराई राज यांच्यासह कस्तुरी, एराडू, बयालू दारी, गिरि कान्ये, र्हास लेकुक’सह ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, काही काळापासून वृद्धापकाळाने आलेल्या आजारांनी ते ग्रस्त होते. यामुळे भगवान यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि वयाच्या ८९ व्या वर्षी आज बंगरूळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी एसके भगवान यांच्या निधनावर ट्विट करून की, दोरे-भगवान यांच्या जोडीने कन्नड चित्रपट सृष्टीला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. भगवान यांनी त्यांचे मित्र दोराई राज यांच्यासह कस्तुरी, एराडू, बयालू दारी, गिरि कान्ये, र्हास लेकुक’सह ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. एसके भगवान यांच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.