दोन हजारांच्या नोटेनंतर आता ‘या’ नोटांसंदर्भात मोठी अपडेट

तरुण भारत लाईव्ह । नाशिक : दोन हजाराची नोट बंद झाल्यामुळे आता पाचशे आणि अन्य नोटांची मागणी बाजारात वाढणार आहे. त्यामुळेच नाशिकरोडमधील करन्सी नोट प्रेसमध्ये पाचशे आणि अन्य नोटांची अधिक छपाई करण्यात येणार आहे. पाचशेच्या १९७५ दशलक्ष नोटा छापण्याचे टार्गट करन्सी नोट प्रेसला देण्यात आलेले आहे. तसेच नाशिकसह देवास येथील प्रेसला तीनशे ते चारशे दशलक्ष ५०० रुपयांच्या नोटा छापण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान नोटाबंदीच्या निर्णयामुळे छपाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. २ हजारांच्या नोटाबंदीमुळे ५०० च्या नोटांच्या अतिरिक्त छपाई करता देवास येथील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.  ११-११ तास काम करण्याचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांसमोर असल्याचे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ११ तासांच्या दोन शिफ्ट करून काम करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. त्यामुळे दिवसभरात एकूण २२ तास काम चालणार आहे. सध्या देवास येथील नोटप्रेसमध्ये १,१०० कर्मचारी कार्यरत आहेत.