नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ मासिक पेन्शन निर्धारीत सध्याच्या सूत्रात बदल करण्यावर गंभीरपणे विचार करत आहे. या अंतर्गत, संपूर्ण पेन्शनपात्र सेवेदरम्यान काढलेल्या सरासरी पेन्शनपात्र वेतनाच्या आधारे मासिक पेन्शन निश्चित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, अद्याप हे केवळ प्रस्तावाच्या टप्प्यावर आहे आणि यावर अद्याप चर्चा होणे बाकी आहे. अंतिम निर्णय झालेला नाही आणि ‘ऍक्च्युरी’चा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
सध्या कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ईपीएस-९५ अंतर्गत मासिक पेन्शन निश्चित करण्यासाठी ईपीएफओ ….. पेन्शनपात्र पगार (गेल्या ६० महिन्यांचा सरासरी पगार) पट पेन्शनपात्र सेवेच्या / ७०.. हे सूत्र वापरते. सूत्रानुसार, ईपीएस-९५ अंतर्गत मासिक पेन्शनचे सूत्र बदलण्याचा प्रस्ताव असून यामध्ये, निवृत्तीवेतनपात्र वेतन हे मागील ६० महिन्यांचे सरासरी निवृत्तीवेतनपात्र वेतन आणि निवृत्तीवेतन पात्र सेवेदरम्यान मिळालेल्या सरासरी पेन्शनपात्र वेतनाच्या बदली करण्याचे नियोजन आहे.
उल्लेखनीय आहे की जर ईपीएसने पेन्शनचा फॉर्म्युला बदलला तर यामुळे वाढीव पेन्शनचा पर्याय निवडणार्यांसह सर्वांच्या मासिक पेन्शनचे निर्धारण सध्याच्या सूत्राच्या तुलनेत कमी होईल. मात्र यावर अद्याप निर्णय नसल्याने नेमका कसा व काय बदल होईल, हे सांगणे थोडसे कठीण आहे. असे असले तरी या विषयावर चर्चा सुरु झाल्यामुळे आता पेन्शन धारकांचे लक्ष या निर्णयाकडे लागून आहे.