मुंबई : उद्धव ठाकरे यांची ४० आमदार आणि १६ खासदारांनी साथ सोडली, पक्षनाव आणि चिन्हही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळालं. आता शिवसनेचा मूळ गाभा असलेल्या शाखाही एकनाथ शिंदे गटाकडे जाणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवसेना पक्षाचा शाखा आणि निधीही निवडणूक आयोगाच्या सुनावणीनुसार ज्याच्या पक्षात निकाल जाईल त्याच्याकडे द्या, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. यात एकनाथ शिंदेंची बाजू मजबूत झाल्याचे मानले जात आहे. एकनाथ शिंदेंना यापूर्वीच धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह मिळाले आहे. परिणामी हा निकालही त्यांच्या बाजूने लागणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
‘एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या सर्वोच्चपदी कायम रहाण्याची वेळ आली. तर शिवसेना शाखा, पक्षनिधी आणि उर्वरित सर्वच
शिवसेनेच्या मालमत्ता त्यांच्याकडे याव्यात,’ अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. उद्धव ठाकरेंना ही भीती आधीपासूनच असल्याने त्यांनी पक्षनिधी वळवण्याची प्रक्रीया सुरूच केली होती. ज्यांच्या पक्षात हा निकाल जाईल त्यांच्याकडेच पक्षनिधी, शाखा आणि शिवसेना पक्षाच्या स्थावर मालमत्ताही वळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तशा बातम्याही आल्या होत्या. ही प्रक्रीया थांबविण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर सत्तासंघर्षाच्या सुनावणीवेळीच याचिका विचारात घ्यावी, अशी विनंतही याचिकाकर्ते वकिलांनी केली आहे. शिवसेनेची निगडीत ज्या काही मालमत्ता आहे, त्या सर्वच्या सर्व ज्या व्यक्तीकडे शिवसेनेचा ताबा येईल, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. २४ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडणार आहे, त्यावेळीच ही याचिकाही विचारात घेतली जाणार असल्याचे मत याचिकाकर्त्यांनी केले आहे.