तळोदा । शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या (अक्कलकुवा रस्त्यावर) दिलीप धानका यांच्या म्हशीच्या पारडूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्लयात पारडूचा मृत्यू झाला असून, शरीराच्या मागचा भाग बिबट्याने फाडून टाकला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
अक्कलकुवा रस्ताच्या कडेला दिलीप धानका हे वास्तव्याला आहेत. त्यांचे ३ म्हसी आणि २ गाई आहेत. या परिसरात बिबट्याचे वावर असून, बिबट्याला दोन-तीन वेळा पळून लावले आहे.
दरम्यान, दि. ६ रोजी पहाटे ३ वाजे दरम्यान बिबट्याने म्हसीच्या पारडूला हल्ला करून ठार केले. पारडूवर हल्ला झाल्याने म्हसी, गाईने हंबरडाफोटला. याचा आवाज ऐकून दिलीप धानका व त्याची मुले घरा बाहेर आले असता बिबट्या पळून गेला.
याबाबत वनविभागास कळवण्यात आले. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. दरम्यान, शहराच्या वेशीवर बिबटयाच्या मुक्तसंचारात दिवसेन दिवस वाढ होत आहे. त्यामुळे वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.