---Advertisement---
जळगाव : शेतात निघालेल्या तरुण शेतकऱ्याचा कारने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पाचोरा रस्त्यावरील भडगाव येथील आरटीओ कार्यालयाजवळ ही घटना घडली. अजय गुलाब पवार (२१ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव शहरातील यशवंत नगर भागातील २१ वर्षीय अजय हा तरुण शेतात जात होता. दरम्यान, समोरून येणाऱ्या कारने ओव्हरटेक करताना त्याच्या दुचाकीस उडवले. या अपघातात अजयचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ८ रोजी सायंकाळी पाचोरा रस्त्यावरील भडगाव येथील आरटीओ कार्यालयाजवळ घडली.
याबाबत राजेंद्र रामचंद्र मोरे (भडगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार भरधाव वेगात गाडी चालवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ इक्बाल शेख हे करीत आहेत.