बीडः खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी थेट मुख्यमत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला होता. त्याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांसह मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनाही पत्र दिले होते. संजय राऊत यांच्या या आरोपानंतर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांच्यावर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तर याच मुद्यावरून आता बीड जिल्ह्यातही संजय राऊत यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांच्यावर ठाण्यासह आता बीडमध्ये गुन्हा दाखल झाला असल्याने शिवसेना आता आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.