---Advertisement---

संतापजनक! महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा अन् रेकॉर्ड करायचा विवस्त्र व्हिडिओ, अखेर गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव : जळगाव जिल्ह्यात एका नराधमाने दोन महिलांना प्रेमाचे आमिष दाखविले, व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्यास सांगितले आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यानंतर ते समाज माध्यमांवर व्हायरल केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पीडित महिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रानुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील संशयित आरोपी श्रीकृष्ण अनिल चिखलकर याने एका ३६ वर्षीय फिर्यादी महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. व्हिडिओ कॉल करून तिच्यावर विवस्त्र होण्यास दबाव टाकला आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने तो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पीडित महिलाने दिलेल्या फिर्यादीवरून नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच संशयित आरोपीने आणखीन एका तरुणीलादेखील प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दबाव टाकत विवस्त्र व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओही समाज माध्यमांवर व्हायरल केला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते करीत आहेत.

एक कोटींच्या विम्यासाठी मेहुण्याने शालकालाच संपवले

पारोळा : शालकाच्या नावावर असलेल्या कोट्यवधींची विमा पॉलिसी पाहून मेहुण्याची नियत बदलली.मित्राच्या मदतीने त्याने शालकाचाच डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केला. खुनाला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी शालकाचा मृतदेह पारोळा पोलीस ठाणे हद्दीत दुचाकीसह फेकून देण्यात आला. सुमारे १५ दिवसांपूर्वी दाखल असलल्या अपघाताच्या नोंदीनंतर पारोळा पोलिसांनी सूक्ष्म रितीने केलेल्या तपासात हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मेहुण्यासह त्याच्या साथीदार मित्राला पारोळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. समाधान शिवाजी पाटील (वय २६, फागणे, जि. धुळे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment