---Advertisement---

शेअर बाजाराच्या एका नियमात मोठा बदल; वाचा सविस्तर, होईल फायदा

---Advertisement---

मुंबई : शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कारण शेअर बाजाराच्या एका नियमात बदल करण्यात आला आहे. या नव्या नियमामुळे गुंतवणूकदारांना फायदाच होणार आहे. तर नेमका कोणता बदल करण्यात आला आहे व त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल ? याची माहिती आज आपण जाणून घेवूयात.

सध्या तुम्ही तुमचा कोणताही शेअर विकला तर त्याची रक्कम दुसऱ्या दिवशी तुमच्या डिमॅट खात्यात जमा होते. या प्रणालीला टी प्लस वन सेटलमेंट म्हणतात. सध्या भारतीय शेअर बाजारात टी प्लस वन सेटलमेंट सायकल चालते. सेबीनं २८ मार्चपासून ऑप्शनल बेसिसवर टी + झिरो ट्रेड सायकल सेटलमेंट सुरू करण्याची योजना आखली आहे. टी प्लस झिरो सेटलमेंट म्हणजे शेअर्सची ज्या दिवशी विक्री केली जाईल त्याच दिवशी तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल.

बाजार नियामक सेबीनं ने T+0 सेटलमेंट दोन टप्प्यात लागू करण्याची योजना आखली आहे. T+0 सेटलमेंटच्या पहिल्या टप्प्यात, नियामकानं शेअर बाजारात दुपारी १.३० वाजेपर्यंत केलेल्या सर्व व्यवहारांसाठी त्याच दिवशी सेटलमेंट प्रस्तावित केली आहे. जर तुम्ही दुपारी १:३० वाजेपूर्वी व्यवहार केला असेल, तर तुमच्या डिमॅट खात्यातील फंड आणि तुमच्या डिमॅट खात्यातील स्टॉक त्याच दिवशी दुपारी ४:३० वाजेपर्यंत काढले जातील.

दुसऱ्या टप्प्यात सेबीनं पर्याय म्हणून इंमिडिएट ट्रेड बाय ट्रेड सेटलमेंटची व्यवस्था केली आहे. दुसऱ्या टप्प्यात, तुम्ही दुपारी ३.३० वाजेपर्यंत व्यवहार केला असला तरीही, फंड तुमच्या डिमॅट खात्यात येईल. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस फेज वनमध्ये पर्यायी T+0 सेटलमेंट लागू केली जाऊ शकते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment