---Advertisement---

श्री मोठे राममंदिर संस्थानला १४ कोटी १६ लाखाचा धनादेश प्रदान

---Advertisement---

पारोळा : येथील श्रीराम मंदिर संस्थानची नॅशनल हायवे नं.६ वर काही जमिन अधिग्रहीत झालेली होती. त्या जमिनीचा मोबदला यापूर्वीही दिड कोटीचा मिळाला होता आणि आषाढी एकादीशीचे निमित्त साधून दि.०६ रोजी मंदिरत घेतलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात अमळनेरचे प्राताधिकारी नितीन मुंदावरे, माजी खा. ए. टी. पाटील, पारोळ्याचे तहसिलदार डॉ. उल्हास देवरे याच्यासह मान्यवरांच्या हस्ते १४ कोटी १६ लाख रुपयाचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष गोपालशेठ अग्रवाल, कल्पेशशेठ अग्रवाल, अॅड. दत्ताजी महाजन, डॉ.अनिल गुजराथी यांना प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे हा मोबदला मिळवून देण्यासाठी जळगावचे अॅड. किशोर पाटील यांनी एक रुपया न घेता हा मोबदला मिळवून दिला.

या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. ए.टी. पाटील तर व्यासपिठावर अमळनेरचे प्रांताधिकारी नितीन मुंदावरे, पारोळ्याचे तहसिलदार डॉ.उल्हास देवरे, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख गोविंद शिरोळे, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, अॅड.अतुल मोरे, युवानेते अॅड.रोहन मोरे, सीए मुकेश चोरडीया, भाजपा तालुकाध्यक्ष अतुल पवार, शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, बालाजी संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब शिंपी आदी उपस्थित होते. यावेळी मा. खा. पाटील, प्रांताधिकारी नितीन मुंदावरे, गोविद शिरोळे, सुरेंद्र बोहरा, अॅड अतुल मोरे, सीए मुकेश चोरडीया, अॅड. रोहन मोरे आदिंनी मनोगत व्यक्त केले. संस्थानने या पैश्याचा उपयोग मंदिराच्या विकासासाठी, नागरिकांच्या सुविधांसाठी, गोरगरीबाच्या कल्याणासाठी करावा असा सल्ला उपस्थितांनी दिला. प्रास्ताविकात संस्थानचा लेखाजोखा अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी मांडला. यावेळी शहर तलाठी निशिकात माने, केशव क्षत्रीय, चंद्रकांत शिंपी, अनिल टोळकर, सचिन गुजराथी, समीर वैद्य, युवराज चैत्राम पाटील, रमेश महाजन, लक्ष्मीकात भावसार, धीरज महाजन, जितेंद्र चौधरी, संकेत दाणेज, भुषण टिपरे, छोटू पाटील, भावडू राजपूत, भैय्या महाजन, बापू पुंजू महाजन, देविदास चैत्राम पाटील, मनोज चौधरी, राहुल निकम, भगवान महाजन, विनोद पाटील याच्यासह भाजपा, रा.स्व. संघाच्या कार्यकत्यांसह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुत्रसंचालन सुनिल भालेराव यांनी केले तर आभार विश्वस्त कल्पेशशेठ अग्रवाल यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रकाश पाटील, अरुण भोई ईश्वर पाटील, डोंगर चौधरी, अमोल वाणी, गोपीचंद चौधरी, अशोक शिंदे, रोशन मराठे, वेदांत ठाकूर मंदिराचे पुजारी हरीनारायण मिश्रा व श्रीराम भक्तांनी परिश्रम घेतले. यावेळी संस्थानने फराळ वाटपाचा कार्यक्रम देखील घेतला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---