---Advertisement---

जळगावात दोन गटात तुफान हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल; काय आहे कारण ?

---Advertisement---

जळगाव : जुन्या वादाच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना नंदगाव येथे बुधवार, ३ रोजी घडली. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहे.

जळगाव तालुक्यातील नंदगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना बुधवारी ३ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. यात दोन्ही गटातील ४ जण गंभीर जखमी झाले आहे. यात पहिल्या गटातील रत्नाबाई रामनाथ पाटील (वय ४०, रा.नंदगाव) यांच्या फिर्यादीनुसार कल्पेश लक्ष्मण सोनवणे, रिंकू प्रकाश सोनवणे, रितेश प्रकाश सोनवणे, विशाल मधूकर सोनवणे, आकाश मधूकर सोनवणे, सनि राजेंद्र सोनवणे, कृष्ण राजेंद्र सोनवणे, धनराज गेंदा सोनवणे, तुषार कृष्णा सोनवणे, नितीन सोपान सोनवणे, भावेश लक्ष्मण सोनवणे आणि मुरलीधर धनराज सोनवणे सर्व रा. नंदगाव ता. जळगाव यांच्यावर गुरूवार ४ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तर गटातील मुरलीधर धनराज सोनवणे रा. नंदगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूषण गुणवंतराव पवार, रामनाथ पंडित पाटील, राज रामनाथ पाटील, वीरेंद्र पांडुरंग पाटील, प्रशांत संभाजी पाटील, ओम लालू पाटील, वैभव सुनील पाटील, श्रीराम पंडित पाटील, ज्ञानेश्वर हरी पाटील, राहुल विश्वनाथ पाटील, दीपक काशिनाथ पाटील, गुलाब आधार पाटील, जिजाबराव काशिनाथ जाधव, राजेंद्र बापू पाटील, वसंत पंडित पाटील आणि भाऊसाहेब पितांबर पाटील सर्व रा. नंदगाव ता. जळगाव यांच्यावर गुरूवार ४ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. असे एकुण २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिपक चौधरी हे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment