जळगाव । जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथून पोषण आहाराशी संबंधित एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गर्भवती महिलांना व बालकांना अंगणवाडी शाळामधून वितरित होणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात चक्क मेलेला उंदिर आढळला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जळगावातील नसीराबाद येथे अंगणवाडीतून पोषण आहाराच्या पाकिटात एक मेलेल्या उंदराचे पिल्लू सापडलेले आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. यातील मिक्स तांदळाच्या पाकिटात हे पिल्लू आढळले आहे.
गृहिणीच्या स्वयंपाका दरम्यान हा धक्कादायक प्रकार लक्षात आलेला आहे. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलेला आहे. हा पोषण आहार आहे की बालकांच्या जीवाशी केलेला खेळ आहे. असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. परंतु आता या प्रकरणी नक्की कारवाई होणार आहे का आणि कारवाई झाली तरी काय होईल? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.