---Advertisement---

दुर्दैवी! उसाच्या मळ्यातील पालापाचोळा जाळताना शेतमजुराचा होरपळून मृत्यू

---Advertisement---

पाचोरा : उसाच्या मळ्यातील पालापाचोळा जाळताना ८२ वर्षीय शेतमजुराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. गोकुळ पवार असे मृत शेतमजुराचे नाव आहे. तालुक्यातील किन्ही शिवारात ही घटना नुकतीच घडली. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

पवार हे उसाच्या मळ्यातील पालापाचोळा एकत्रित करून जाळत असताना हवेमुळे आगीने रुद्रावतार धारण केला. वाढत्या आगीची आजूबाजूच्या शेतीला झळ बसू नये म्हणून पाण्याने आग विझवत असताना त्यांनाच आगीने विळखा दिला. त्यात ते भाजले जाऊन अत्यवस्थ झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून हा गुन्हा सोयगाव पोलिसांकडे वर्ग केला आहे. गोकुळ पवार यांच्या पश्‍चात पश्चात पत्नी, तीन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---