चार वाहनांचा विचित्र अपघात; पाचोऱ्याचा युवक ठार

एरंडोल : येथे म्हसावद रस्त्यावर श्री कृपा जिनिंगजवळ ईरटीका, ट्रक, ॲपे रिक्षा व दुचाकी अशा चार वाहनांचा चित्र अपघात झाल्याची दुर्घटना रविवारी घडली. या अपघातात दुचाकीस्वार राम कृष्ण भागवत पाटील (मु.सामनेर हमु ठाकरे कॉलनी पाचोरा) हा युवक जागीच ठार झाला. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

एरंडोलकडून म्हसावदकडे  (R j 10GB 8528) क्रमांकाचा ट्रक जात होता. तर  समोरून MH 19 V1267 क्रमांकाची रिक्षा येत होती. दरम्यान, ट्रकला (MH DQ8174) क्रमांकाची दुचाकी ओव्हरटेक करत होती, तर रिक्षाला  18बीसी1408 क्रमांकाची ईरटीका ओव्हरटेक करताना दोघेही वाहनांची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील हा युवक जागीच गतप्राण झाला.

मृत युवक हा कुटुंबातील एकुलता एक होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली यावेळी गणेश पाटील खेडी राजू भावसार एरंडोल विठ्ठल वंजारी एरंडोल तसेच उमरजे येथील काही ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी सदर घटनेची माहिती मिळताच तत्परतेने अपघात स्थळी दाखल झाले.

सदर युवक हा सुशिक्षित बेरोजगार असून रोजगारासाठी जळगाव येथे मुलाखत देऊन घराकडे परत जात होता यावेळी वाटेवरच क्रूळ काळाने त्याच्यावर घाला घातला.