---Advertisement---
जळगाव : घरात सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी त्यांनी जुगार खेळणाऱ्यांकडून रोकड आणि मोबाइल फोनसह एकूण १२ लाख २४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, स्थानिक गुन्हे शाखेला पाळधी येथे घरात जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वात या अड्ड्यावर छापा टाकला.
यावेळी पोलिसांनी १६ जणांना ताब्यात घेत, त्यांच्याकडून ७ लाख २२ हजार २६० रुपयांची रोकड आणि ५ लाख २ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे मोबाइल फोन जप्त केले. हा सर्व मुद्देमाल जप्त करून संशयितांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.